MVF प्रक्रिया

महाराष्ट्राच्या समृद्ध भविष्यासाठी आणि महाराष्ट्र व्हिजन फोरममध्ये सहभागी होण्यासाठी ४ सोप्या स्टेप्स

स्टेप १
मतदान
स्टेप २
नोंदणी
3
स्टेप ३
सबमिट
4
स्टेप ४
सादरीकरण
मतदान
नोंदणी
सबमिट
सादरीकरण

MVF मतदान

तुमच्या दृष्टिकोणातून अतिमहत्वाचे प्रश्न अर्थात महाराष्ट्राच्या समृद्ध भविष्यासाठीचे ३ प्रमुख मुद्दे निवडा.

खेळ  

महाराष्ट्र ही भारताची क्रीडा राजधानी व्हावी यासाठी जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन खेळाडूंना जागतिक स्तरावरील खेळांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करणे.

संस्कृती आणि पर्यटन  

महाराष्ट्राला लाभलेला समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी तसेच मराठी अस्मितेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पर्यटनाला प्रोत्साहन देणे.

हवामान बदल  

विविध प्रदूषणांमुळे जागतिक हवामानात घडत असलेले बदल आटोक्यात आणण्याच्या दृष्टीने आपल्या राज्याने पुढाकार घेऊन नागरिकांना जागरूक बनवणे.

स्वच्छता  

महाराष्ट्र हे देशातील सर्वात स्वच्छ राज्य व्हावे यासाठी सर्व शहरे कचरामुक्त करणे.

रोजगार  

युवांना प्राधान्य देऊन राज्याच्या प्रगतीत भागीदार बनवण्यासाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देणे.

लिंग समानता  

सर्व महिलांना समान दर्जाच्या संधी उपलब्ध करून, पुरुषसत्ताक पद्धतीतील सामाजिक-आर्थिक तसेच राजकीय क्षेत्रातील विषमता दूर करणे.

प्रादेशिक असमानता  

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचा मानवी विकास निर्देशांक उंचावणे. (HDI गुण ०.८ पेक्षा जास्त)

गृहनिर्माण  

महाराष्ट्राला झोपडपट्टीमुक्त व बेघरमुक्त बनवण्यासाठी सरसकट सर्वांना निवारा उपलब्ध करून देणे.

अनुसूचित जाती आणि जमातींचे कल्याण  

सर्वसमावेशक समाजाची निर्मिती करणे, जिथे अनुसूचित जाती आणि जमातींना समान अधिकार, सन्मानाची वागणूक, सामाजिक न्याय आणि संधीची समानता मिळेल.

ऊर्जा  

प्रत्येक घराला परवडेल अशा दर्जेदार ऊर्जेचा आणि नैसर्गिक ऊर्जास्रोतांचा खात्रीशीर २४ तास वीज पुरवठा होईल याची सुनिश्चीतता करणे.

कायदा आणि सुव्यवस्था  

महाराष्ट्राला गुन्हेगारी मुक्त करून, नागरिकांना सुरक्षित आणि संरक्षित वाटेल अशी एकोप्याची भावना निर्माण करणे.

गरिबी  

गरिबी दूर करून प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणे.

शिक्षण  

सर्व स्तरातील मुलांना परवडेल अशा जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी समान संधी उबलब्ध करून देणे.

भूक  

सर्वांना पौष्टिक आणि पुरेशा अन्न उपलब्धतेद्वारे कुपोषण आणि भूक समस्यांचे निर्मूलन करणे.

आरोग्यसेवा  

शारीरिक आणि मानसिक आरोग्य निरोगी आणि सुव्यस्थित ठेवण्यासाठी सर्वांना परवडेल अशा उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा प्रदान करणे.

शेती  

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कृषी कर्जात घट करण्याबरोबरच हवामानपूरक कृषी प्रणाली विकसित करणे.

पिण्याचे पाणी  

प्रत्येक घराला २४ तास नळाचे पाणी मिळेल याची सुनिश्चीतता करणे.

वायू प्रदूषण  

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी हवेची गुणवत्ता राखण्यासाठी प्रदूषण अटोक्यात आणणे.

उद्योग  

अत्याधुनिक पायाभूत सोयी-सुविधांसह महाराष्ट्राचे रूपांतर जागतिक दर्जाच्या उद्योगसमूह, स्टार्ट-अप्स आणि इनोव्हेशन हबमध्ये करणे.

इतर व्हिजन पॉईंट

तुमचा स्वतःचा व्हिजन पॉईंट महाराष्ट्रासाठी लिहा.

MVF संकल्पना

MVF Introduction

MVF संकल्पना

‘महाराष्ट्र व्हिजन फोरम’(MVF) हे राज्यातील युवांसाठी राजकीय आणि धोरण प्रक्रियेवर प्रभाव टाकून महाराष्ट्रासाठी युवा केंद्रित अजेंडा तयार करण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे. MVF महाराष्ट्रातील युवांना एकत्र आणण्यासाठी एक चळवळ उभारण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याचा ७५ वा वर्धापन दिन २०३५ मध्ये साजरा करण्यात येणार आहे, तोपर्यंत सर्वसमावेशक शाश्वत विकास साधण्यासाठी राज्यातील युवांच्या सहभागाने अजेंडा तयार करण्याचा MVF चा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या उत्कर्षाचे दिवस परत आणण्यासाठी आणि पुन्हा एकदा देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनण्यासाठी युवांच्या सृजनशील विचारांचा उपयोग करणे हे MVF चे उद्दिष्ट आहे.

डाउनलोड ब्रोचर

MVF समर्थक

सहभागी व्हा : महाराष्ट्र व्हिजन फोरमला कोण पाठिंबा देतंय पाहा

MVF लाईव्ह काउंटर

महाराष्ट्र व्हिजन फोरमवर लोकसहभाग दर्शवणारी आकडेवारी

578419

MVF मतदार

44468

MVF सदस्य

40747

MVF कॅप्टन्स

MVF गॅलरी

महाराष्ट्र व्हिजन फोरमबद्दल अपडेट्स मिळवा

MVF वृत्त

महाराष्ट्र व्हिजन फोरमबद्दल ताज्या बातम्या आणि अपडेट्स

MVF FAQs

MVF संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न

युवकांचा धोरणात्मक निर्णय प्रक्रियेतील सहभाव वाढावा व त्यांना राज्याच्या विकासाचा नियोजन आराखडा निर्मिती प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेता यावा यासाठी प्रोत्साहीत करणारे खुले व्यासपीठ म्हणजेच महाराष्ट्र व्हिजन फोरम (MVF).
राज्याच्या समृद्धीसाठी युवांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा उपयोग करत त्यांना राज्यासाठी धोरणे बनवण्याची संधी उपलब्ध करुण देणे तसेच महाराष्ट्राला देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणे हा MVF चा उद्देश आहे. राज्याच्या विकासाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्यासाठी तरुणांना सक्षम बनवण्यासाठी MVF प्रयत्न करणार आहे.
राज्याच्या विकासाचा धागा होण्यास इच्छुक असलेली महाराष्ट्रातील १८ ते ४५ वयोगटातील कोणतीही व्यक्ती MVF चा भाग होऊ शकते.

MVF मध्ये सहभागी होण्याच्या ४ सोप्या पायऱ्या आहेत:

१) महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम द्या.

२) महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या प्रश्नावर उपाययोजना आखण्यासाठी नोंदणी करा.

३) महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नावर आपली उपाययोजना नोंदवा.

४) महाराष्ट्रासाठी आखलेली उपाययोजना उद्योजक व धोरणकर्त्यांसमोर मांडा.

एखादी व्यक्ती फक्त एकदाच आणि एकच मत देऊ शकते आणि ३ व्हिजन पॉइंट्स निवडू शकते.
MVF हे एक असे व्यासपीठ आहे जे तरुणांना महाराष्ट्राच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त करुण देईल तसेच राज्याची विकास धोरणे तयार करण्यात युवांना महतवाची भूमिका बजावण्यास सक्षम करेल. समाजाच्या विकासासाठी युवांना सक्रिय सहभाग देत संधी उपलब्ध करून देण्याचा MVF हा एक समावेशक आणि कार्यक्षम उपक्रम आहे.
MVF हे युवांना महाराष्ट्राच्या सार्वजनिक धोरणांबद्दल जागरूक बनण्यासाठी, समजून घेण्यासाठी आणि त्यात आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी मौल्यवान संधी देत आहे. MVF मध्ये सहभागी झाल्यामुळे युवावर्ग केवळ धोरणाविषयी सजग बनणार नाहीत, तर ते एक चांगले आणि जबाबदार नागरिक बनतील. याशिवाय त्यांना राज्यातील आघाडीच्या धोरणकर्त्यांसमोर त्यांचे उपाय सांगण्याची संधीही दिली जाईल.
एकूण लोकसंख्येच्या तुलनेत युवा वर्ग मोठा असल्याने व्यवस्थेतील धोरणांचा युवा वर्गावर थेट प्रभाव पडतो. शिवाय युवा वर्गात सर्जनशीलता आणि नवनिर्मितीची आवड असल्याने धोरण-निर्मितीमध्ये नवीन संकल्पना आणि त्यावरील उपाययोजना पुढे येणार आहेत. हेच तरुण उद्याचा समाज घडवणार आहेत त्यामुळे त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभाग करून येणाऱ्या पिढ्यांसमोरील प्रश्न आणि त्यावरील उपाय समजून घेण्यास मदत होणार आहे.
राज्याचे धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग वाढवून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी युवावर्गाला सक्षम करण्याचा MVF चा प्रयत्न असणार आहे. राज्यातील सर्वात गंभीर समस्या सोडवण्यासाठी तरुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा व महाराष्ट्रासाठी युवा-केंद्रित अजेंडा विकसित करण्याचा प्रयत्न असणार आहे. युवा वर्गाला योग्य मार्गदर्शन देऊन करत. MVF हे व्यासपीठ तरुणांचा आवाज ऐकण्यासाठी आणि बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेल्या साधनांसह सुसज्ज आहे.
MVF पूर्णपणे अ-राजकीय आहे, हे कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा राजकीय विचारसरणीशी संबंधित नाही.

युवा वर्गाला सोबत घेऊनच महाराष्ट्र हे एक विकसित राज्य बनू शकते यावर रोहित पवार यांचा ठाम विश्वास आहे. त्यांचा विश्वास आहे की राज्याच्या तरुण आणि उत्साही युवा वर्गामध्ये सर्वसमावेशक विकास, रोजगार निर्मिती आणि राज्याला समृद्धीकडे घेऊन जाण्याची क्षमता आहे.

महाराष्ट्र व्हिजन फोरमच्या माध्यमातून, सन २०३५ साली साजऱ्या होणाऱ्या राज्याच्या ७५ व्या वर्धापन दिनापर्यंत शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी राज्याच्या धोरण निर्मिती प्रक्रियेत युवांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे हे रोहित पवार यांचे उद्दिष्ट आहे. राज्यातील तरुणांशी थेट संवाद साधून आणि त्यांना मार्गदर्शन करून, महाराष्ट्राला देशातील क्रमांक १ चे राज्य बनवण्याच्या त्यांच्या ध्येयासाठी कटिबद्ध असलेल्या तरुण समुदायाला ताकद देण्याची त्यांची अपेक्षा आहे.

सहभागी होण्यासाठी तुमचे वय १८-४५ असावे आणि आपण महाराष्ट्राचे नागरिक असणेबंधनकारक आहे.
महाराष्ट्रातील युवा नेता म्हणून रोहित पवार सातत्याने तरुणांशी संवाद साधत असतात. गेल्या वर्षी दिल्ली मध्ये UPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना, त्यांनी क्षमता असलेल्या तरुणांना राष्ट्र उभारणीत योगदान देण्यासाठी व्यासपीठाची गरज ओळखली. याचबरोबर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असताना, त्यांनी अनेक प्रतिभावान तरुणांसोबत संवाद साधला आहे, जे त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना आणि समाधानाभिमुख दृष्टिकोनातून समाजाचा विकास करू इच्छितात. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, त्यांनी यापूर्वीही तरुणांना एकत्र करून अशा पद्धतीचे काही कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यातीलच एक कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्र कनेक्ट' या कार्यक्रमाचा उद्देश हा महाराष्ट्राच्या सर्वसमावेशक विकास अजेंड्यावर सामूहिक प्रयत्न करणे हा होता. या कार्यक्रमाच्या यशस्वी प्रयत्नानंतर त्यांना MVF सुरु करण्याची गरज भासू लागली ज्याद्वारे महाराष्ट्रातील तरुणांना राज्याच्या विकासाच्या प्रवासात सहयोग आणि योगदान देणारे व्यासपीठ मिळेल.
महाराष्ट्र राज्यातील तरुणांना त्यांच्या महत्वाकांक्षा आणि संकल्पनांना सर्वांसमोर आणण्यासाठी आणि राज्याचे भविष्य घडवणाऱ्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे MVF चे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात तरुणांचे प्रतिनिधित्व तसेच धोरण ठरवण्यात सहभाग नसणे, राजकारणात तरुणांचे असणारे असमान प्रतिनिधित्व हे प्रश्न डोळ्यासमोर ठेऊन MVF ची स्थापना करण्यात आली. तरुणांना एकत्र आणून राज्याच्या विकासाची दिशा ठरवण्यासाठी त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, MVF हे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी समान न्याय्य आणि शाश्वत भविष्यासाठी एक कृतीशील अजेंडा तयार करण्यावर भर देणार आहे.
तुमचा डेटा आमच्याकडे सुरक्षित असेल याची शाश्वती MVF देते. या उपक्रमासाठी तुमचा पाठिंबा आहे एवढच हायलाइट करण्यासाठी ते रेकॉर्ड केले जाईल. आणि तुमच्या माहितीचा उपयोग केवळ MVF बद्दल माहिती देण्य़ासाठी केला जाईल. (जर तुम्ही ते निवडले असेल).
आपण सध्या केवळ महाराष्ट्र व्हिजन फोरमसाठी वेबसाइट (www.mahavisionforum.com) सुरू केली आहे.
मतदान करताना MVF तुमच्या माहितीचा तपशील गुप्त ठेवण्याचे आश्वासन देते. आम्ही तुमचा वैयक्तिक तपशील तसेच व्यक्तींची ओळख कोणासोबतही, कुठेही शेअर करणार नाही याची शाश्वती देतो.
५ वेगवेगळ्या प्रकारचे निकष लावून, आम्ही मतांचे वेगळेपण ओळखू. एखाद्या व्यक्तीला दोनदा मतदान करता येईल परंतु अशा परिस्थितीत, आम्ही फक्त पहिल्या वेळेला केलेले मत ग्राह्य धरु.
ज्या युवांना आपल्या बुदधीचा वापर करुन, महाराष्ट्राच्या उत्कर्षात मोलाचा वाटा उचलायचा असेल त्याचबरोबर आपले राज्य देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य म्हणून परत पाहायचे असेल तर, त्या युवांनी MVF चा एक भाग बनले पाहिजे.
होय, नागरिकांनी मतदान केल्यावर निकाल पाहता येतील, ज्यांनी MVF वेबसाइटवर नोंदणी केली असेल ते मतदान प्रक्रियेदरम्यान कधीही वेबसाईटवरती परत येऊ शकतील आणि निकाल पाहू शकतील.
कोणत्याही प्रश्नांसाठी, आपण आमच्याशी [email protected] या ईमेल आयडीवरती संपर्क साधू शकता.
या वेबसाइट ला भेट द्या आणि डाउनलोड करा. - https://mahavisionforum.com/song
गाणं ऐकण्यासाठी या वेबसाइट वर भेट द्या आणि आत्ताच गाणं डाउनलोड करा. - https://mahavisionforum.com/song
हो, नक्कीच. रिंगटोन डाउनलोड करण्यासाठी या वेबसाइट वर क्लीक करा. - https://mahavisionforum.com/song